शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 9:12 PM

गुजरातच्या एका ऑटो ड्रायव्हरने केजरीवालांना रात्री जेवण्याचे आमंत्रण दिले, पण पोलिसांनी केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले.

अहमदाबाद: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावत आहे. आज केजरीवाल यांनी दिवसभर ऑटो चालकांशी संवाद साधला, यादरम्यान एका ऑटोचालकाने त्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. केजरीवालांनी विनंती मान्य करत रात्री आठची वेळ निश्चित केली. मात्र गुजरात पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ऑटोमध्ये जाण्यापासून रोखले.

भाजप घाबरला आहे- सिसोदियापोलिसांनी रोखल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भाजपचे लोक जनतेच्या नेत्याला लोकांमध्ये जाण्यापासून रोखत आहेत. अरविंद केजरीवाल जनतेत जाण्याची भाजपला भीती आहे,' असे सिसोदिया म्हणाले. दुसरीकडे, दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करत केजरीवालांवर हल्ला चढवला आहे. 'गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना विशेष संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. केजरीवाल यांच्यावर हिंसक हल्ला होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. केजरीवाल यांच्याकडे 32 सरकारी वाहने आहेत. असा तमाशा करणे लज्जास्पद आहे,' अशी टीका मिश्रा यांनी केली.

चालकांशी संवाद साधताना ऑटोचालक विक्रम ललतानी यांनी केजरीवाल यांना सांगितले की, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मी सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये तुम्ही पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी जेवायला गेला होता. माझ्या घरी पण जेवायला याल का? यावर केजरीवाल यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की, पंजाब आणि इथेही ऑटोवाले मला आवडतात. तुम्ही आठ वाजता माझ्या हॉटेलवर या, आम्ही तुमच्यासोबत ऑटोने तुमच्या घरी जाऊ. या दरम्यान ललतानीने आनंदाने मान हलवली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव गुजरात पोलिसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ऑटोमध्ये जाऊ दिले नाही.

केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोलआज अरवीद केजरीवालांनी 'फ्री कल्चर'वरुन भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझ्यावर फ्री कल्चरचा आरोप केला जातो. मात्र सर्वांना मोफत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आरोप करणारे आपल्या मुलांना परदेशात शिकवतात आणि आम्ही दिलेल्या मोफत शिक्षणावर प्रश्न उपस्थित करतात. त्यांना मतदान करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही त्यांना मत दिले तर तुमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. गुजरातमध्ये 'आप'चे सरकार आल्यास चांगले आणि मोफत उपचार मिळतील. वीज फुकट दिली जाईल, 18 वर्षांवरील मुलींना दरमहा 1 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी आश्वासने यावेळी केजरीवालांनी दिली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGujaratगुजरातAAPआपElectionनिवडणूकBJPभाजपा