अहमदाबाद - गुजरात एटीएस आणि इंडियन कोस्टगार्डच्या संयुक्त कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना ड्रग्ससह अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून १७५ कोटी किंमतीचे ड्रग्स ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून हा माल भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएस मिळाली. सध्या पोलिसांनी या ५ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
या प्रकरणावर बोलताना गुजरात एटीएसने सांगितलं आहे की, पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटीतून ड्रग्स आणणार असल्याची माहिती खबरींनी दिली. त्यानुसार कोस्टगार्ड, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि गुजरात एटीएसने सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी पाकिस्तानच्या कराचीवरुन निघालेली बोट कच्छच्या सीमेवरुन भारतात प्रवेश केल्याचं कळालं. त्यावेळी या बोटीला पकडण्यात आलं. यामध्ये ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ पाकिटं जप्त करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर कच्छच्या सीमेवरील सुरक्षा वाढविण्यात आली होती. गुजरातमार्गेने दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती असल्याने कोस्टगार्ड आणि भारतीय नौदलाने या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.