अहमदाबाद : पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोनच दिवसांतच गुजरात काँग्रेसची अधिकृत वेबसाइट हॅक करण्यात आली असून, काँग्रेसने ती लगेचच बंद केली आहे.काँग्रेसची वेबसाइट हॅक करताना त्यावरील मजकूर काढण्यात आला आहे. तसेच हार्दिक पटेलचे स्वागत आहे, असा मजकूर त्यावर टाकताना हार्दिक पटेल यांचे कथित सेक्स व्हिडीओतील फोटा टाकण्यात आले आहेत. ही व्हिडीओ टेप पूर्वीही प्रसारित करण्यात आली होती. तेव्हा ही आपली नसल्याचा दावा हार्दिक पटेल यांनी केला होता. तसेच ते फोटो वा व्हिडीओ आपले असल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले होते. भाजपाने हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.अर्थात आमची वेबसाइट हॅक केल्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोषी यांनी सांगितले. ते म्हणाले की, हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा ज्यांना त्रास होत आहे, त्यांनीच आमची वेबसाइट हॅक केली आहे. काँग्रेसची वेबसाइट पुन्हा दोन दिवसांत वेबसाइट सुरू होईल, असे ते म्हणाले.भाजपाची वेबसाइट बंदचनवी दिल्ली : भाजपाची वेबसाइट कोणी तरी १२ दिवसांपूर्वी हॅक करण्यात आली होती. ती लगेच सुरू करण्यात येईल, असे भाजपाने तेव्हा जाहीर केले होते. मात्र ती वेबसाइट अद्याप सुरू झालेली नाही. त्या वेबसाइटवर जाताच, आम्ही लवकरच परत येऊ , असा मजकूर त्यावर आजही दिसत आहे. इतक्या दिवसांत ती भाजपाने पुन्हा का सुरू केली नाही, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)
गुजरात काँग्रेसची वेबसाइट झाली हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 5:24 AM