Gujarat curfew : गुजरातमध्ये दर मिनिटाला २ जण होतायेत कोरोनाबाधित, हायकोर्टाने ३ -४ दिवस कर्फ्यू लावण्याचे दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:19 PM2021-04-06T19:19:28+5:302021-04-06T19:24:59+5:30
Gujarat curfew : हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेईल. गुजरातमध्ये दररोज सुमारे तीन हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत.
अहमदाबाद - गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च न्यायालयाने शनिवार व रविवार कर्फ्यू लावण्यास सांगितले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, राज्यात ३ - ४ दिवसांचा कर्फ्यू लागू कारवाया. आता हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने कर्फ्यू लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेईल. गुजरातमध्ये दररोज सुमारे तीन हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत.
हायकोर्टाने वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आणि असेही म्हटले की, राज्यातील सरकारी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालावी.
या सूचना विमानतळांना देण्यात आल्या आहेत
गुजरातमध्ये येणार्या लोकांना आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणे आवश्यक असेल. बोर्डिंग पॉईंटवर गुजरातमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे हे रिपोर्ट तपासण्याच्या सूचनाही एअरलाइन्सला देण्यात आल्या आहेत.
आठ नवीन कोविड केअर केंद्रे
गुजरातमधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रमाणाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी आठ मोठ्या शहरांमध्ये कोविड -१९ नवीन केंद्रे उघडण्याची घोषणा केली. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ५०० बेड आहेत.
दर मिनिटाला दोन लोक संक्रमित होत आहेत
सोमवारी गुजरातमध्ये कोरोना बाधित ३१६० नवीन रुग्णांची नोंद केली गेली आहे. राज्यात सध्या १६२५२ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात पाहिल्यास दर दोन मिनिटांनी दोन लोकांना कोरोनाची लागण होत आहे.