Doctor removes kidney instead of stone : गुजरातमधील एका रुग्णालयात अजब घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एक रुग्ण किडनी स्टोनच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता, परंतु डॉक्टरनं त्याची किडनीच काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे संबंधित व्यक्तीचा ४ महिन्यांनी मृत्यूही झाला. दरम्यान, यानंतर गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगानं (Gujarat State Consumer Dispute Redressal Commission) बालासिनोर येथील केएमजी रुग्णालयाला ११.२३ लाखांची नुकसान भरपाई रुग्णाच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आयोगानं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रुपात रुग्णालय यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. रुग्णालय केवळ आपलया कामकाज आणि चुकीसाठीच जबाबदार नाही, तर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणासाठीही जबाबदार असल्याचं आयोगानं म्हटलं. याशिवाय २०१२ पासून आतापर्यंत ७.५ टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
किडनी स्टोनसाठी दाखल करण्यात आलं होतंखेडा जिल्ह्यातील वांगरोली गावातील देवेंद्रभाई रावल यांनी आपल्या होत असलेल्या त्रासानंतर केएमजी जनरल रुग्णलयातील डॉ. शिवूभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला होता. मे २०११ मध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना अन्य सुविधाही मिळाव्या यासाठी दुसऱ्या रुग्णालयाचा पर्याय सुचवला. परंतु रावल यांनी त्याच रुग्णालयात उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली.
३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान, त्यांची किडनीच काढल्याचं सांगितल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. तसंच रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीनं निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर रावल यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्यांना नाडियाड येथील किडनी रुग्णालयात दाखल करऑण्यात आली. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं IKDRC रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु ८ जानेवारी २०१२ रोजी त्यांचं निधन झालं.
आयोगाशी संपर्कयानंतर रावल कुटुंबीयांनी जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाशी संपर्क साधला. या ठिकाणी उपचारात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आयोगानं डॉक्टर, रुग्णालय आणि युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लिमिटेडला ११.२३ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. परंतु नुकसान भरपाई कोण देणार यासाठी पुन्हा अपील करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणासाठी इन्शूरन्स कंपनी जबाबदार नसल्याचं आयोगानं सांगितलं. तसंच हे डॉक्टर आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचं प्रकरण असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.