Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 10:13 AM2022-11-25T10:13:09+5:302022-11-25T10:13:42+5:30

Gujarat Election 2022: २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे.

Gujarat Election 2022: Congress 'Jam' despite BJP cutting tickets for veterans, former agriculture minister in Jamnagar | Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

Next

जामनगर : २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव व भाजपचे मजबूत संघटन यामुळे तेथे काँग्रेसच्या विजयाचाच रस्ता जाम झाल्याचे चित्र आहे. उलट जामनगर ग्रामीणची गमावलेली जागा परत मिळविण्यासाठी भाजपने दिग्गज माजी कृषिमंत्र्याला मैदानात उतरवून मशागत सुरू केली आहे.

जामनगर ग्रामीणमध्ये भाजपचे कृषी कार्ड
गेल्यावेळी पाटीदार व शेतकरी आंदोलनामुळे गमावलेली  जामनगर ग्रामीणची जागा जिंकण्यासाठी भाजपने कृषी कार्ड खेळत पाटीदार समाजाचे नेते माजी कृषिमंत्री राघव पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. २०१७ मध्ये ही जागा काँग्रेसचे वल्लभ धारविया यांनी जिंकली होती; पण दोन वर्षांतच ते भाजपमध्ये गेले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपने  राघव पटेल यांना पुन्हा संधी दिली. कृषिमंत्री म्हणून त्यांच्या कामांची चर्चा आहे. 

Web Title: Gujarat Election 2022: Congress 'Jam' despite BJP cutting tickets for veterans, former agriculture minister in Jamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.