जामनगर : २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जामनगरच्या उत्तर व दक्षिणच्या जागांचे आपल्या दोन्ही दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव व भाजपचे मजबूत संघटन यामुळे तेथे काँग्रेसच्या विजयाचाच रस्ता जाम झाल्याचे चित्र आहे. उलट जामनगर ग्रामीणची गमावलेली जागा परत मिळविण्यासाठी भाजपने दिग्गज माजी कृषिमंत्र्याला मैदानात उतरवून मशागत सुरू केली आहे.
जामनगर ग्रामीणमध्ये भाजपचे कृषी कार्डगेल्यावेळी पाटीदार व शेतकरी आंदोलनामुळे गमावलेली जामनगर ग्रामीणची जागा जिंकण्यासाठी भाजपने कृषी कार्ड खेळत पाटीदार समाजाचे नेते माजी कृषिमंत्री राघव पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. २०१७ मध्ये ही जागा काँग्रेसचे वल्लभ धारविया यांनी जिंकली होती; पण दोन वर्षांतच ते भाजपमध्ये गेले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपने राघव पटेल यांना पुन्हा संधी दिली. कृषिमंत्री म्हणून त्यांच्या कामांची चर्चा आहे.