Gujarat Election 2022:'मला नालीतला किडा म्हणतात, नीच म्हणतात, पण...' PM मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:05 IST2022-11-21T15:03:52+5:302022-11-21T15:05:32+5:30
PM Modi Alleges Congress: 'काँग्रेसवाले म्हणतात की, मोदींना त्यांची लायकी दाखवून देऊ. माझी लायकी दाखवण्यापेक्षा विकासकामांवर बोला.'

Gujarat Election 2022:'मला नालीतला किडा म्हणतात, नीच म्हणतात, पण...' PM मोदींचा काँग्रेसवर मोठा आरोप
Narendra Modi's Statement: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये एका सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच आणि आणि मृत्यूचा व्यापारी म्हणतात, पण मी गुपचूप अपमान गिळतो.'
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले म्हणतात की, मोदींना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही राजघराण्यातील आहात, मी एक सामान्य कुटुंबातील आहे. तुम्ही मला नीच, खालच्या जातीचा म्हणालात, माझी कोणतीच लायकी नाही. तुम्ही मला मृत्यूचा व्यापारी देखील म्हणतात. आता माझी लायकी दाखवण्यापेक्षा विकासकामांवर बोला. मी अशा अपमानाकडे दुर्लक्ष करतो, कारण मला भारताला एक विकसित देश बनवायचे आहे. मला 135 कोटी लोकांसाठी काम करायचे आहे, म्हणून मी अपमानाकडे दुर्लक्ष करतो.'
गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाटेसारखे काहीही नाही
मोदी पुढे म्हणतात की, 'गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाटेसारखे काहीही नाही. ज्यांनी गुजरातला पाणी दिले नाही ते पदासाठी यात्रा करत आहेत. गुजरातमध्ये 24 तास वीज मिळून 10 वर्षे झाली. नर्मदेच्या विरोधकांना शिक्षा देण्यासाठी ही निवडणूक व्हायला हवी. पद मिळावे म्हणून पदयात्रेला विरोध नाही, पण गुजरातच्या नर्मदाविरोधकांना आपल्याकडे का ठेवायचे? या गुजरातचा एकही नागरिक असा नसेल ज्याने गुजरातचे मीठ खाल्ले नाही. पण काही लोक इथले मीठ खाऊन गुजरातला शिव्या देतात,' अशी टीकाही त्यांनी केली.