Gujarat Election 2022: खाम, कोकम, खाम्प, बदाम, ऑप्ट... राजकारणात जातींची बेरीज-वजाबाकी

By यदू जोशी | Published: November 25, 2022 07:44 AM2022-11-25T07:44:44+5:302022-11-25T08:00:16+5:30

Gujarat Assembly Election 2022: मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते.

Gujarat Election 2022: Kham, Kokum, Khamp, Badam, Opt... Addition-Subtraction of Castes in Politics | Gujarat Election 2022: खाम, कोकम, खाम्प, बदाम, ऑप्ट... राजकारणात जातींची बेरीज-वजाबाकी

Gujarat Election 2022: खाम, कोकम, खाम्प, बदाम, ऑप्ट... राजकारणात जातींची बेरीज-वजाबाकी

googlenewsNext

- यदु जोशी
गांधीनगर : मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते. विविध पक्षांनी जातींच्या आधारावर केलेले तिकीटवाटप त्याची साक्ष देते. मात्र यावेळी जातीय समीकरणांवर विकासाचा मुद्दा भारी राहील, असे मानणारा मोठा वर्गही आहे. 
आर्थिकदृष्ट्या समृद्ध अशा या राज्यात जातींच्या जाणिवाही तितक्याच गडद आहेत. १९९० मध्ये चिमणभाई पटेल यांनी कोकम (केओकेएम) फॉर्म्युल्याच्या आधारे ७० जागा जिंकल्या, भाजपबरोबर युती करत मुख्यमंत्रिपद मिळविले. कोकम म्हणजे कोळी, कानबी (पटेल), मुस्लिम. २०१७ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांनी आपले दिवंगत पिता माधवसिंह सोळंकी यांचा खाम फॉर्म्युला विस्तारला तो खाम्प या नावाने. खाममध्ये त्यांनी पाटीदारांना जोडले. तरीही काँग्रेस जिंकू शकली नव्हती. 

भाजपने सुरुवातीपासूनच ऑप्ट (ओपीटी) समीकरणाला जन्म घातला. म्हणजे ओबीसी, पाटीदार अन् आदिवासी. या तीन समाजांची ७४ टक्के व्होटबँक भाजपला गेली २७ वर्षे भरभरून विजय देत राहिली. काही विश्लेषकांच्या मते भाजपने ऑप्टचा आभास निर्माण केला; पण त्यांची व्होटबँक जैवाबाप म्हणजे जैन, वैश्य, ब्राह्मण आणि पाटीदार अशीच होती.  गेल्यावेळी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात पाटीदार काँग्रेससोबत गेले, तरीही परीक्षा भाजपनेच जिंकली. आता पटेल भाजपमध्ये आहेत.

यावेळचे चित्र? 
भाजप : जैवाबापवरील भिस्त कायम ठेवत ऑप्ट फॉर्म्युला आणला आहे. 
काँग्रेस : खाम, खाम्पच्या ऐवजी बदाम बक्षीपंच (म्हणजे ओबीसी), दलित व मुस्लिम असे समीकरण जुळवू पाहत आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी याचे सूतोवाच केले.
आम आदमी पार्टी : जातींऐवजी कामगार, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी असे विविध वर्गांवर लक्ष.

२०१५ मध्ये पाटीदार, ओबीसी आंदोलनांनी पुन्हा एकदा जातीयतेचा बोलबाला होता; पण यावेळी असे दिसत नाही. गुजरात व गुजरातींचे प्रश्न हा मुद्दा केंद्रस्थानी दिसत आहे.
    - दिलीप गोहिल, राजकीय 
    विश्लेषक, अहमदाबाद

महाराष्ट्रातही फॉर्म्युले
आपल्याकडे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी माधव फॉर्म्युला आणला होता. म्हणजे माळी-धनगर-वंजारी. काँग्रेसचे तत्कालीन नेते माधवसिंह सोळंकी यांनी ऐेंशीच्या दशकात खाम (केएचएएम) फॉर्म्युला आणला. म्हणजे कोळी, क्षत्रिय हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम या समाजाची मोट बांधून ते मुख्यमंत्री झाले.

Web Title: Gujarat Election 2022: Kham, Kokum, Khamp, Badam, Opt... Addition-Subtraction of Castes in Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.