PM Modi Roadshow: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी (1 डिसेंबर) मतदान झाले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त झाले आहेत. आज सायंकाळपासून मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदींचा हा 54 किमी लांबीचा रोड शो रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असून, याद्वारे ते 14 विधानसभा मतदारसंघांचा प्रवास करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निवडणूक रोड शो आहे.
भाजपच्या या रोड सोला 'पुष्पांजली यात्रा' असे नाव देण्यात आले आहे. या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील 13 आणि गांधीनगरमधील 1 विधानसभा क्षेत्राचा दौरा करतील. मोदींनी अहमदाबादमधील रोड शो दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. हा रोड शो ज्या शहरांमधून जात आहे, त्यापैकी 11 जागा भाजपने 2017 मध्ये जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधानांनी 6 नोव्हेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली होती.
संबंधित बातमी- एका कुटुंबाला खूश करण्यासाठी मला 'रावण' म्हणाले, 'शिव्या' दिल्या; PM मोदींचा घणाघात...
या जागांवरून पंतप्रधानांचा ताफा जाणार आहेपंतप्रधानांनी आतापर्यंत 33 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या आहेत. यादरम्यान पीएम मोदींनी 28 रॅली आणि 2 रोड शो केले आहेत. आज पंतप्रधानांचा तिसरा रोड शो आहे. पंतप्रधानांचा हा रोड शो नरोडा - ठक्कर बापानगर - बापूनगर - निकोल - अमराईवाडी - मणिनगर - दाणीलिमडा - जमालपूर - खाडिया - एलिसब्रिज - वेजलपूर - घाटलोडिया - नारनपुरा - साबरमती - गांधीनगर दक्षिण या विधानसभा क्षेत्रातून जाणार आहे.