Gujarat Election 2022: एका कुटुंबाला खूश करण्यासाठी मला 'रावण' म्हणाले, 'शिव्या' दिल्या; PM मोदींचा घणाघात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:47 PM2022-12-01T16:47:48+5:302022-12-01T16:48:31+5:30
Gujarat Election 2022: 'काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्यामध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू.'
Gujarat Election 2022: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत. पीएम मोदींनी आज कलोल येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू असल्याचा टोला मोदींनी लगावला. तसेच, कोणी मला हिटलर म्हणतो तर कोणी रावण म्हणतो. एका कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी खर्गे यांनी मला रावण म्हटले, असेही मोदी म्हणाले.
गुजरात: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कलोल में आयोजित एक जनसभा को संबोधित कर रहे हैं। pic.twitter.com/vEwL0cUoUe
— ANI_HindiNews (@AHindinews) December 1, 2022
माझे गुण कांग्रेसला त्रास देतात
यावेळी लोकांना उद्देशून पीएम मोदी पुढे म्हणतात की, ज्या मोदीला तुम्ही बनवले, त्याचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. मी गुजरातचा मुलगा आहे. तुमच्यामुळे माझ्यात जे गुण आले, ते गुण काँग्रेसला त्रास देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, 2014 च्या आधी भारत मोबाइलच्या क्षेत्रात इतकी मोठी क्रांती करेल, असा विचारही कुणी केला नव्हता. 2014 मध्ये दिल्लीत मोबाइल फोन तयार करण्याचे दोन कारखाने होते, आता 200 पेक्षा जास्त आहेत. आपण जगातील सर्वात मोठे फोन निर्माता झालो आहोत, अंसही मोदी म्हणाले.
मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू आहे
यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस पार्टी रामसेतूचा तिरस्कार करते. पंतप्रधान पदाचा अपमान करण्यासाठी मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू आहे. कोणी रावण बोलतो तर कोणी हिटलर बोलतो. काँग्रेसला माहिती नाही की, गुजरातमध्ये रामभक्त आहेत. रामभक्तांच्या भूमिवर त्यांनी मला 100 डोके असलेला रावण म्हटले आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास असता, तर त्यांनी माझ्यावर अशी टीका केली नसती, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.