- शरद गुप्तानवी दिल्ली : हिंदुत्वाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांनीही अल्पसंख्याकांना उमेदवारी देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
भाजपने १८२ उमेदवारांपैकी पुन्हा एकदा एकाही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, तर काँग्रेसने सहा मुस्लीम उमेदवारांना मैदानात उतरविले आहे. अनेक राज्यांत काँग्रेसची जागा घेण्याचे राजकारण करणाऱ्या आपने केवळ दोन मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमध्ये ९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे; पण सध्याच्या विधानसभेत केवळ दोन मुस्लीम आमदार आहेत. म्हणजेच, एकूण आमदारांच्या संख्येच्या जवळपास एक टक्का. २० वर्षांपूर्वी गुजरात विधानसभेत १७ मुस्लीम आमदार होते.
चमकोगिरी आयएएस अधिकाऱ्याला भोवलीउत्तर प्रदेशमधील आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकांत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना निरीक्षक म्हणून नेमले होते. या कामाशी संबंधित काही छायाचित्रे या आयएएस अधिकाऱ्याने इन्स्टाग्रामवर झळकविली. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयोगाने अभिषेक सिंह यांना निरीक्षक पदावरून दूर केले.
तब्बल २५ वर्षांपूर्वी भाजपकडून उमेदवारीभाजपने २५ वर्षांपूर्वी मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली होती. आता दर विधानसभा निवडणुकीत मुस्लीम आमदारांची संख्या कमी होत आहे. यावर्षी मुस्लीम उमेदवारच कमी आहेत. त्यामुळे अशी शक्यता आहे की, गत निवडणुकीपेक्षा यंदा कमी मुस्लीम आमदार असतील. ओवेसी यांच्या पक्षानेही १४ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यातील तीन उमेदवार हिंदू आहेत.