Gujarat Election 2022: 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार नाही, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने घेतला आहे. मात्र भाजप विविध निवडणुकांमध्ये काही अपवादात्मक ठिकाणी आपला नियम मोडत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजपने आपला नियम मोडला आहे. गुजरात निवडणुकीत भाजपने मांजलपूर मतदारसंघातून 76 वर्षीय योगेश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. योगेश पटेल यांच्याशिवाय दुसरा पर्याय येथे सापडला नसल्याचा दावा केला जात आहे.
पटेल यांचे क्षेत्रात वर्चस्वयोगेश पटेल हे गुजरात निवडणुकीतील सर्वात सर्वात वयोवृदद्ध उमेदवार आहेत. पटेल हे रावपूरमधून पाच वेळा आमदार झाले आहेत, पण 2012 मध्ये मांजलपूरची नवीन विधानसभा जागा आली. 2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून ते मांजलपूरमधून आमदार झाले. आता 2022 मध्ये तो पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 76 वर्षीय योगेश पटेल यांचा त्यांच्या भागात बऱ्यापैकी दबदबा आहे आणि ते अनेक वर्षांपासून परिसरातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, यामुळेच भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे उमेदवार सर्वात वयोवृद्ध योगेश पटेल यांच्याशिवाय गुजरात निवडणुकीत इतर 7 उमेदवार आहेत, ज्यांनी पाचपेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे. सातपैकी पाच उमेदवार भाजपचे, तर एक उमेदवार अपक्ष आहे. भाजपकडून मांजलपूरमधून योगेश पटेल, द्वारकामधून पबुभा मेनक, गरियाधरमधून केशू नाकर्णी, भावनगर ग्रामीणमधून पुरुषोत्तम सोलंकी आणि नडियादमधून पंकज देसाई हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे, झगडिया मतदारसंघातून 75 वर्षीय छोटू भाई वसावा, तर मधु श्रीवास्तव अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
1 डिसेंबर रोजी मतदानगुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच पक्षांचे दिग्गज जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे.