Gujarat Election: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह चुडासामा आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या सर्वांनी आपला निर्णय पक्षनेतृत्वालाही कळवला आहे. दुसरीकडे, विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्री राहिलेले सौरभ पटेल आणि प्रदीप सिंह जडेजा यांचीही निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. आतापर्यंत एकूण आठ माजी मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सौरभ पटेल हे अंबानी कुटुंबाचे जावई आहेत. नरेंद्र मोदी सरकार आणि विजय रुपाणी सरकारमध्ये ते ऊर्जामंत्रीही राहिले आहेत. यावेळी ते निवडणूक लढवणार नाहीत. गुजरातमधील नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारमधील कोणता मंत्री निवडणूक लढवणार याबाबत साशंकता कायम आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.नवीन लोकांना संधी द्यावी : रुपाणीगुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप यावेळीही पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भाजपचे बडे नेते गुजरातच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून जोरदार प्रचारात गुंतले आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, निवडणुकीत नव्या लोकांना, कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. मी निवडणूक लढवणार नाही. तसे पत्र दिल्लीला पाठवले आहे. केंद्रीय निवडणूक समिती जे काही उमेदवार निवडेल, त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करेल.
हे मंत्री निवडणूक लढवणार नाहीतराजकोट पश्चिम - विजय रूपाणी - मुख्यमंत्री मेहसाणा- नितीन पटेल - उपमुख्यमंत्रीवटवा - प्रदीप सिंह जडेजा - गृह मंत्रीढोलका- भूपेंद्रसिंह चुडासमा- शिक्षण मंत्रीबोटाद- सौरभ पटेल- ऊर्जा मंत्रीभावनगर - विभावरी दावे - महिला आणि बालविकास मंत्री अहमदाबाद, ठक्कर बापानगर - वल्लभ काकडिया - ट्रांसपोर्ट मंत्री जामनगर, कालावाड - आर सी फलदू - कृषी मंत्री