शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

गुजरात निवडणूक - 'भाजपाने पसरवली काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:51 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे

ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी पसवरुन गोंधळ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोपकाँग्रेसने ही यादी सोशल मीडियावर परसवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षरीचा वापर केल्याचाही आरोप भाजपाने जाहीर माफी मागण्याची काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी पसवरुन गोंधळ निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने ही यादी सोशल मीडियावर परसवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षरीचा वापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 

'आमच्या आयटी सेलने तपास केला असता भाजपाच्या वेबसाईटसाठी वापरण्यात आलेल्या फोनवरुनच ही यादी प्रसिद्ध झाल्याचं समोर आलं आहे', असा आरोप गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोषी यांनी केला आहे. 'खोटी यादी पसरवत भाजपाला अशी नौटंकी करण्याची गजर का आहे ? याचं उत्तर त्यांनी लोकांना द्यायला हवं. त्यांना जाहीर माफी मागितली पाहिजे', असं मनिष दोषी बोलले आहेत. 

गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनीदेखील आपली खोटी स्वाक्षरी असलेली उमेदवार यादी ट्विटरवर व्हायरल होत असल्याचं सांगितल आहे. 'काँग्रेसने अशी कोणतीही यादी जाहीर केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. उमेदवार कोण असतील हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. उमेदवारांची नावं दिल्लीत काँग्रेस कमिटीकडूनच जाहीर होतात', असं त्यांनी सांगितलं आहे. 

'गुजरातमध्ये काँग्रेसची प्रसिद्धी वाढत असल्या कारणाने भाजपा घाबरली आहे', असा टोला भरतसिंह सोलंकी यांनी लगावला आहे. 'राहुल गांधींच्या नवसर्जन यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, मतदारांना भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे', असंही ते बोलले आहेत. 

यादी जाहीर होताच पाटीदार आणि काँग्रेस समर्थकांमध्ये राडा - गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पटेलांचं वर्चस्व असलेल्या सुरतमधील वरच्चा रोड येथून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या कार्यालयाजवळच दोन्ही कार्यकर्ते आपापसांत भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. काँग्रेसने रात्री उशिरा 77 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या यादीत पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या दोन नेत्यांच नाव होतं. 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाcongressकाँग्रेस