गुजरात विधानसभा निवडणुकीची उलटी गिनती सुरू झालेली आहे. गेल्या दहा वर्षांत दोन राज्यांत सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षासमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. गुजरात विधानसभा आणि एमसीडी या दोन्ही निवडणुकांसाठी आपकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच, एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक नवी भविष्यवाणी करत गुजरात निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळते हे सांगितले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी हे लिहूनही दिले आहे.
एबीपी न्यूजच्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपसाठी आपच आव्हान आहे, यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी निवडणूक घ्यावी. याच बरोब, आपण मॉर्डन जमान्याचे अभिमन्यू आहोत, यामुळे आपल्याला भाजपच्या चक्रव्यूहातून बाहेरही पडता येते, दोन्ही निवडणुकीत जनतेचे चांगले समर्थन मिळत आहे. जनता आमच्यासोबत आहे आणि चक्रव्यूह त्यांच्यासोबत आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
अरविंद केजरीवालांनी केली भविष्यवाणी -गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मते विभागली जातात. यात तिसऱ्याला जागा कुठे? यावर बोलताना केजरीवाल म्हणाले, कुठलीही गोष्ट स्टेबल मानली जाऊ शकत नाही. मला केशुभाई पटेल आणि शंकर सिंह बघेला यांच्याबद्दल आदर आहे. ते त्यांच्या काळातील चांगले नेते होते. मात्र यावेळी चमत्कार होत आहे. याच वेळी भविष्यवाणी करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 5 जागा मिळतील. एवढेच नाही, तर त्यांनी हे एका कागदावरही लिहून दिले आहे.