Gujarat Election Result 2022 Live : गुजरातमध्ये AAP ची दमदार एंट्री, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घरी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:54 AM2022-12-08T07:54:29+5:302022-12-08T14:57:07+5:30

Gujarat Assembly election result 2022 Live Updates : पंतप्रधान मोदींनी स्वत: विशेष लक्ष दिल्याने मोदींचीही प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला लागली आहे.  सकाळी ८ वाजल्यापासून येथील निकालाला सुरुवात झाली आहे.

Gujarat Election Result 2022 Live : Gujarat election results start, BJP-Congress or AAP will win in state of narendra modi and amit shah | Gujarat Election Result 2022 Live : गुजरातमध्ये AAP ची दमदार एंट्री, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घरी

Gujarat Election Result 2022 Live : गुजरातमध्ये AAP ची दमदार एंट्री, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घरी

googlenewsNext

Gujarat Assembly election result 2022 Live Updates : देशभराचे लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि पाच राज्यांतील सहा विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे गुरुवार हा राजकीयदृष्ट्या ‘निकाल दिन’ ठरणार आहे. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून भाजपची सत्ता असून यंदा भाजप जिंकणार की आप अन् काँग्रेसचा करिश्मा पाहायला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वत: विशेष लक्ष दिल्याने मोदींचीही प्रतिष्ठा गुजरातमध्ये पणाला लागली आहे.  सकाळी ८ वाजल्यापासून येथील निकालाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, एक्झिट पोलमध्ये गुजरातच यंदा बाजी मारणार असा अंदाज दिसून येत आहे. 

LIVE

Get Latest Updates

02:54 PM

गुजरातमध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पराभूत

गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांसह अनेक बड्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे आपली जागा वाचवू शकले नाहीत त्यांना भाजपाचे उमेदवार मुलुभाई बेरा यांनी मात दिली.

12:59 PM

काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांचे भाजपावर गंभीर आरोप

11:10 AM

गुजरातमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, मोदी ६ वाजता भाजप कार्यालयात

गुजरातमध्ये भाजपचा विजय आता निश्चित मानला जात आहे. सध्या टेलिव्हीजनवर दिसत असलेल्या आकडेवारीनुसार भाजप रेकॉर्डब्रेक विजयासह सत्ता स्थापन करेल. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असून ते मिठाई वाटून, ढोल-ताशा लावून विजय साजरा करत आहेत. त्याच पार्श्भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोणार असून तेथे कोअर कमिटीसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर जनतेला संबोधित करणार आहेत. 

09:50 AM

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सकाळी ९.३० वाजेपर्यंत भाजप २८ जागांवर आघाडी

09:14 AM

भाजपच्या रिवाबा जडेजा आघाडीवर, विजयाचा विश्वास

गुजरातच्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिबावा जडेजा भाजप उमेदवार आहेत. या मतदारसंघातील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार रिवाबा जडेजा यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, रिवाबा जडेजा यांनी विजयाचा निश्चिय बोलून दाखवला आहे. 

09:09 AM

हार्दीक पटेल ३०० मतांनी आघाडीवर

भाजप नेते आणि वीरमगाम मतदारसंघाचे उमेदवार हार्दीक पटेल केवळ ३०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे, येथे कँग्रेस उमेदवार आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे. 

09:01 AM

आम आदमी पक्षाचे उमेदवार पिछाडीवर, गुजरातमध्ये भाजपच वरचढ

संभालिया मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशुदान गढवी हे पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी गढवी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. येथील जागेवर भाजपचे मुलू गेरा हे आघाडीवर आहेत. 
 

08:43 AM

भाजप रेकॉर्डब्रेक जागां जिंकून सत्ता स्थापन करणार - पुर्नेश मोदी

08:32 AM

भाजपला सुरुवातीलाच मोठी आघाडी, आम आदमी पक्ष तिसऱ्या स्थानावर

गुजरात निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप उमेदवार १०१ जागांवर पुढे असून काँग्रेसही ४३ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येते. तर, आम आदमी पक्ष ४ जागांवर पुढे चालत आहे. 
 

08:07 AM

गुजरातधील निवडणुकांच्या निकालाला ८ वाजता सुरुवात झाली, भाजप समर्थकांमध्ये उत्साह

07:58 AM

गुजरात निवडणुकीत भाजप १३५ ते १४५ जागा जिंकून सत्ता स्थापन करणार - हार्दीक पटेल

g

Web Title: Gujarat Election Result 2022 Live : Gujarat election results start, BJP-Congress or AAP will win in state of narendra modi and amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.