08 Dec, 22 02:54 PM
गुजरातमध्ये आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पराभूत
गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांसह अनेक बड्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे आपली जागा वाचवू शकले नाहीत त्यांना भाजपाचे उमेदवार मुलुभाई बेरा यांनी मात दिली.
08 Dec, 22 12:59 PM
काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांचे भाजपावर गंभीर आरोप
08 Dec, 22 11:10 AM
गुजरातमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, मोदी ६ वाजता भाजप कार्यालयात
गुजरातमध्ये भाजपचा विजय आता निश्चित मानला जात आहे. सध्या टेलिव्हीजनवर दिसत असलेल्या आकडेवारीनुसार भाजप रेकॉर्डब्रेक विजयासह सत्ता स्थापन करेल. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष असून ते मिठाई वाटून, ढोल-ताशा लावून विजय साजरा करत आहेत. त्याच पार्श्भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ६ वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयात पोहोणार असून तेथे कोअर कमिटीसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर जनतेला संबोधित करणार आहेत.
08 Dec, 22 09:50 AM
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सकाळी ९.३० वाजेपर्यंत भाजप २८ जागांवर आघाडी
08 Dec, 22 09:14 AM
भाजपच्या रिवाबा जडेजा आघाडीवर, विजयाचा विश्वास
गुजरातच्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिबावा जडेजा भाजप उमेदवार आहेत. या मतदारसंघातील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार रिवाबा जडेजा यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, रिवाबा जडेजा यांनी विजयाचा निश्चिय बोलून दाखवला आहे.
08 Dec, 22 09:09 AM
हार्दीक पटेल ३०० मतांनी आघाडीवर
भाजप नेते आणि वीरमगाम मतदारसंघाचे उमेदवार हार्दीक पटेल केवळ ३०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे, येथे कँग्रेस उमेदवार आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे.
08 Dec, 22 09:01 AM
आम आदमी पक्षाचे उमेदवार पिछाडीवर, गुजरातमध्ये भाजपच वरचढ
संभालिया मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशुदान गढवी हे पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी गढवी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. येथील जागेवर भाजपचे मुलू गेरा हे आघाडीवर आहेत.
08 Dec, 22 08:43 AM
भाजप रेकॉर्डब्रेक जागां जिंकून सत्ता स्थापन करणार - पुर्नेश मोदी
08 Dec, 22 08:32 AM
भाजपला सुरुवातीलाच मोठी आघाडी, आम आदमी पक्ष तिसऱ्या स्थानावर
गुजरात निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप उमेदवार १०१ जागांवर पुढे असून काँग्रेसही ४३ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येते. तर, आम आदमी पक्ष ४ जागांवर पुढे चालत आहे.
08 Dec, 22 07:58 AM
गुजरात निवडणुकीत भाजप १३५ ते १४५ जागा जिंकून सत्ता स्थापन करणार - हार्दीक पटेल
08 Dec, 22 08:07 AM