Gujarat Election Result 2022: धक्कादायक! गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न; भाजपावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:55 AM2022-12-08T11:55:27+5:302022-12-08T11:56:11+5:30
भाजपाने गुजरातमध्ये काँग्रेसची कंबर तोडली आहे. भाजपा गेल्यावेळपेक्षा ५६ जागा पुढे आहे, तर काँग्रेस ६० जागा नुकसानित आहे.
गुजरात विधानसभेत भाजपानेकाँग्रेसची धूळधाण उडवित आजवर कधीही न मिळविलेले यश संपादन केले आहे. १८२ पैकी १५५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. भाजपाने एवढे प्रचंड यश मिळविल्याच्या विरोधात काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांनी मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपाने गुजरातमध्ये काँग्रेसची कंबर तोडली आहे. भाजपा गेल्यावेळपेक्षा ५६ जागा पुढे आहे, तर काँग्रेस ६० जागा नुकसानीतआहे. एवढे मोठे यश १९९५ पासून सत्तेत असलेल्या भाजपाला पहिल्यांदाच मिळाले आहे. गेल्या वेळी भाजपाला ९९ आणि काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसला टक्कर देण्याची आशा होती. परंतु आपला मतदान मोठ्याप्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत.
भाजपाकडून दारुण पराभव होत असल्याचे पाहून गांधीधामचे उमेदवार सोलंकी यांनी भाजपावर ईव्हीएममध्ये घोटाळ्या केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करतानाच सोलंकी यांनी गळ्यात गळफास बांधला आणि मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलंकी यांना आजुबाजुच्या कार्यकर्त्यांनी रोखले आहे.