Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये 'आप'चा 'षटकार", काँग्रेसवर '17 चा खतरा', भाजपा रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:06 AM2022-12-08T10:06:55+5:302022-12-08T10:18:39+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे.
Gujarat Assembly election result 2022 Live Updates : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे. निकालांच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला असून काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट दिसत आहे. मात्र, गुजरात निवडणुकीत पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाने आपले अस्तित्व जाणवून दिले आहे. गुजरात निकालात आम आदमी पार्टीने खाते उघडले असून पक्ष 8 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.
Gujarat Election Result 2022 Live : AAP चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पिछाडीवर, गुजरातमध्ये भाजपच वरचढ
गुजरात निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंत आलेल्या निकालावरुन भाजप 136 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 28 जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे, तर ६ जागांवर इतरांचे वर्चस्व दिसून येत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता राज्यातील 37 मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्तात आणि भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान झाले. गुजरातमध्ये यावर्षी 66.31 टक्के मतदान झाले, तर 2017 मध्ये 71.28 टक्के मतदान झाले होते. भाजप सर्व 182 जागांसाठी आणि आम आदमी पक्षाने 181 जागांसाठी उमेदवार उभे केले. तर काँग्रेसने 179 जागा लढवल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा लढवल्या आहेत.
भाजपच्या रिवाबा जडेजा आघाडीवर, विजयाचा विश्वास
गुजरातच्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिबावा जडेजा भाजप उमेदवार आहेत. या मतदारसंघातील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार रिवाबा जडेजा यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, रिवाबा जडेजा यांनी विजयाचा निश्चिय बोलून दाखवला आहे.