शीलेश शर्मानवी दिल्ली : निवडणुकीत गेल्या सात-आठ वर्षांपासून सलग पराभवाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसनेगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच राज्यात आव्हान देण्यासाठी अन्य काही पक्षांसोबत आघाडी करण्याची काँग्रेसची योजना आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीबाबत स्पष्ट बोलण्यास काँग्रेसचे नेते शक्तिसिंह गोहिल हे तयार नव्हते; परंतु प्राप्त संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अन्य काही पक्षांशी काँग्रेस आघाडी करण्यास इच्छुक आहे.
पारंपरिक मतदार आम्हाला सोडणार नाहीतकाँग्रेसने या तीन समुदायांना पक्षाकडे वळविण्यासाठी आतापासून काम सुरु केले आहे. भाजपमध्ये सध्या घबराट आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे वारंवार गुजरातचा दौरा करीत आहे. गुजरातमधील भाजपचे सरकार आदिवासींना आकर्षित करण्यासाठी बंधू कल्याण योजना राबवत आहे. तथापि, पारंपरिक मतदार भाजपकडे वळणार नाही, असा काँग्रेसचा दावा आहे.