गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:36 PM2017-11-30T13:36:26+5:302017-11-30T13:38:07+5:30

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला.

Gujarat elections: For ten days farmers will be forgiven for the debt, Rahul Gandhi's big announcement | गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

Next

विसावदर (गुजरात): गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला. सरकार स्थापनेच्या 10 दिवसांच्या आत शेतक-यांचं कर्ज माफ करेल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. 

आमचं सरकार शेतकरी, छोटे आणि मध्यम व्यापा-यांचं सरकार असेल. त्यांची काय अपेक्षा आहे हे आम्ही त्यांना विचारू आणि त्यानुसारच आमचं सरकार काम करेल असं राहुल म्हणाले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या भावूक भाषणांवर खोचक टीका केली. 
पंतप्रधान मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता आहेत असं राहुल गांधी म्हणाले. गुजरातच्या सावरकुंडला येथे एका रॅलीमध्ये बोलताना राहुल यांनी मोदींवर टीका केली.    
नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरजच लागत नाही असं राहुल म्हणाले. गुजरात निवडणुकांच्या दोन-तीन दिवस अगोदर या अभिनेत्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येतील. ते सर्व मुद्द्यांवर बोलतील पण कर्जमाफी झाली की नाही, गुजरातमधील शेतक-यांना उत्पादनाचे किती पैसे मिळतात यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार नाहीत.  
गुजरात माझी आई आहे आणि मी गुजरातचा मुलगा असं निवडणूक प्रचारादरम्यान एका भाषणात मोदी म्हणाले होते.  नोटबंदी नंतरच्या एका भाषणात, जर मी काळा पैसा परत आणला नाही तर लोक मला सुळावर लटकवतील असं मोदी म्हणाले होते.  

 

Web Title: Gujarat elections: For ten days farmers will be forgiven for the debt, Rahul Gandhi's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.