गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर दिभाजप मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. बोलताना त्यांनी विजयासाठी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. तसंच निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचेही त्यांनी आभार मानले. “हिमाचल प्रदेशमध्ये एका टक्क्याने मागे राहिली, परंतु विकासासाठी शंभर टक्के कटिबद्ध राहू. भाजपाला लोकांनी मत दिलं कारण भाजपमध्ये मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचा दम आहे. भाजपला मिळणारं जनतेचं समर्थनच हे दाखवतोय की घराणेशाहीविरोधात लोकांचा राग वाढत आहे. गुजरातच्या जनतेनं रेकॉर्डब्रेक मतं दिली आहे. गुजरातमध्ये एक कोटीपेक्षा अधिक मतदारांनी मतदान केलं,” असं मोदी म्हणाले.
“भाजपला मिळणारं समर्थन घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेचा वाढणारा आक्रोश दाखवत आहे. गुजरातच्या जनतेनं रेकॉर्ड तोडण्याचाही रेकॉर्ड केला आहे. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. भाजप आता गुजरातच्या प्रत्येक कुटुंबाचा आणि घरातील भाग आहे,” असं मोदी म्हणाले.“भाजपला मिळालेलं जनतेचं समर्थन भारताच्या नव्या आकांक्षांचं प्रतिबिंब आहे. हे तरुण विचाराचं प्रकटीकरण आहे. भाजपला जे समर्थन मिळालं ते गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सशक्तिकरणासाठी मिळालंय. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजप प्रत्येक सुविधा प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायच्या आहेत. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजप देशाच्या हितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचं धाडस ठेवते,” असंही ते म्हणाले.
'गुजरातमध्ये एक नवा पक्ष (आम आदमी पार्टी) आला, त्यांचे नेते (अरविंद केजरीवाल) एक पेपर घेऊन आले, भविष्यवाणी केली. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार येणार आहे, हे लक्षात घेण्याचे सांगितले. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा असा बेजबाबदार नेता. आज गुजरातच्या निकालानंतर त्यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी, असं नड्डा यावेळी म्हणाले.