सूरत - गुजरातच्या सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (21 जानेवारी) सूरतमधील रघुवीर सेलियम मार्केटमध्ये पहाटे ही भीषण आग लागली आहे. दहा मजली इमारत असून सातव्या मजल्यावर आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
काही महिन्यांपूर्वी सूरतमधील तक्षशीला या कमर्शियल इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग सेंटरमध्ये काही विद्यार्थी अडकले होते. तर काही विद्यार्थ्यांनी आग लागल्यामुळे घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्याची घटना समोर आली होती. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद
‘सीएए’ अंमलबजावणीवरून काँग्रेसमध्ये मतभेद?
अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द