सूरत:गुजरातच्या सुरतजवळील कडोदरामध्ये गुजरात औद्योगिक विकास महामंडळात(GIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विवा पॅकेजिंग मिलमध्ये लागल्यानंतर जीव वाचण्यासाठी काही मजुरांनी पाच मजल्यावरून उड्या मारल्या. तर, काही कारागीरांना हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने वाचवण्यात आलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर काहीजण जखमी आहेत. दरम्यान, 125 मजुरांना वाचवण्यात आलं आहे.
जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळथाच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, घटनास्थळी उच्च अधिकारीदेखील पोहोचले आहेत. अग्निशमन दलाने सांगितल्यानुसार, अग्निशमन दल बचाव कार्यासाठी येण्यापूर्वी काही कामगारांनी इमारतीवरुन खाली उड्या मारल्या.
बचावकार्य सुरूसुरतचे महापौर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्याबरोबरच मदत आणि बचाव कार्यावरही भर दिला जात आहे. तसेच, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आगीचे कारणही शोधले जात आहे. यासह, या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचेही मूल्यांकन केले जात आहे.