शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

गुजरात उच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला, आत्मसमर्पण करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 3:52 PM

गुजरात हायकोर्टाने शनिवारी तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

गुजरात उच्च न्यायालयाने शनिवारी १ जुलै २०२३ कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी त्यांनी ही याचिका दाखल केली होती. सेटलवाड यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीशी गुजरात दंगली प्रकरणात पुरावे देणे आणि साक्षीदारांना प्रशिक्षण देण्याच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे.  

Buldhana Bus Accident: सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे

न्यायमूर्ती निरजर देसाई यांच्यासमोर सुनावणी झाली. तीस्ता सेटलवाड यांचे वकील मिहीर ठाकोर यांनी न्यायालयाचा निकाल दिल्यानंतर ३० दिवसांपर्यंत निकालाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची विनंती केली, पण न्यायमूर्ती देसाई यांनी ही विनंती फेटाळून लावली. २००२ च्या गुजरात दंगलीत निरपराध लोकांना अडकवण्यासाठी त्यांनी पुरावे तयार केल्याचा आरोप सेटलवाड यांच्यावर आहे. या आरोपांनुसार, त्याला गुजरात पोलिसांनी २५ जून २०२२ रोजी अहमदाबाद डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रँच (DCB) च्या FIR वर अटक केली होती. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून २ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणात तीस्तासोबतच आणखी एक आरोपी माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. एक दिवसापूर्वी, दंगलीत मारले गेलेले काँग्रेस खासदार अहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी विशेष तपास पथकाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, तीस्ता सेटलवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, राज्य सरकारचे उच्च अधिकारी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दंगलीत मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूसाठी गोवण्याचा प्रयत्न केला. गुजरात दंगलीतील कटाच्या आरोपातून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना क्लीन चिट मिळाली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयGujaratगुजरात