Corona Vaccine: लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:53 PM2021-05-26T19:53:14+5:302021-05-26T19:59:50+5:30

Corona Vaccine: गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले.

gujarat high court slams state govt over corona vaccination drive | Corona Vaccine: लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

Corona Vaccine: लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

googlenewsNext
ठळक मुद्देलस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात कागुजरात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले

अहमदाबाद: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही पूर्णपणे ओसरलेला दिसत नाही. नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट वाढला असला, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयासह विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये कोरोनाची बिकट परिस्थिती, लसीकरण मोहीम यांसारख्या मुद्द्यांवरून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. लसींच्या उपलब्धतेवरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी गुजरातउच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले असून, लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का, असा सवाल केला आहे. (gujarat high court slams state govt over corona vaccination drive)

कोरोनाची तिसरी लाट येणार, असा इशारा देण्यात आल्यामुळे भारतात लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. कोरोना लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोना लसींच्या तुटवड्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला न्यायालयाने सुनावले आहे. 

‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

परदेशी लस कंपन्या केवळ केंद्राशी करार करण्यास उत्सुक

राज्य सरकार केवळ आपली असहाय्यता दाखवण्याचे काम करत आहे, या शब्दांत उच्च न्यायालयाने खंत व्यक्त केली. यावर परदेशातील लस कंपन्यांशी संपर्क केला होता. मात्र, त्या कंपन्या केवळ केंद्र सरकारशी करार करण्यास उत्सुक आहेत. राज्याने मे महिन्यात १६ लाख लसींचे डोस खरेदी केले असून, जून महिन्यात १०.७ लाख डोस खरेदी करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. या माहितीनंतर याचा अर्थ या गतीने राज्य सरकारने आखलेले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे लागतील, असे सांगत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 

देशात आतापर्यंत किती टक्के लसी वाया गेल्या? ‘या’ राज्याने वाया घालवले सर्वाधिक डोस

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे २ लाख ८ हजार ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ९५ हजार ९५५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या २५ लाखांच्याही खाली आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनामुळे ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: gujarat high court slams state govt over corona vaccination drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.