गुवाहटी - गुजरातमधील वडगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. पालनपूर सर्किट हाऊस येथून बुधावारी रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली आहे. मेवानी यांच्या एका समर्थकाने यासंदर्भात माहिती दिली. तसेच, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आम्हाला दाखवली नाही. केवळ, आसाममध्ये दाखल असलेल्या काही गुन्ह्यांसदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, असेही त्यांच्या टीममधील कार्यकर्त्याने सांगितले.
मेवानी यांना रस्ते महामार्गाने अहमदाबादला नेण्यात येत आहे. जेथून त्यांना रेल्वेद्वारे आसामच्या गुवाहटी येथे नेण्यात येणार आहे. मेवानी यांच्यावर कलम 120 ब (गुन्हेगारी कट), कलम 153(A) (दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 295(A), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि आयटीच्या अॅक्टच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोडसेला देव मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे" असे ट्विटव मेवानी यांनी केले होते. त्यावरुन, त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मेवानी यांना रस्ते महामार्गाने अहमदाबादला नेण्यात येत आहे. जेथून त्यांना रेल्वेद्वारे आसामच्या गुवाहटी येथे नेण्यात येणार आहे.