गुजरात आंदोलन
By admin | Published: August 26, 2015 12:18 AM
पटेलांचे आंदोलन पेटले
पटेलांचे आंदोलन पेटले.......................सर्वत्र जाळपोळ, दगडफेक : पोलीस स्टेशनला लावली आग...........अहमदाबाद, दि. २५ : गुजरातेत पटेल समाजास ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अहमदाबादेत मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीनंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना अटक व सुटका झाली. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून सुरत, मेहसाणा, अहमदाबादेत संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ केली.अहमदाबादेतील सोला भागात एका पोलीस ठाण्यावर चाल करून गेलेल्या जमावाने पोलीस ठाणेच पेटवून दिले, तर सुरतमध्येही जमावाने पोलिसांची जीप पेटवून दिली. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले आहे. तथापि, पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना परिस्थितीवर जातीने लक्ष देण्याचे आदेश देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. बुधवारी पहाटेपर्यंत सुरत, अहमदाबाद, नरोडा, मेहसाणा, भुयंगदेव, रानिप या भागात संतप्त जमावाकडून हिंसाचार सुरू होता. सुरतच्या वरछा, पांडसेरा, पूणगाम, कणदिरा आदी भागांतही जाळपोळ, दगडफेक सुरू होती. (आधीचे वृत्त-देश-परदेश)...............