...अन् 'तो' पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला; कार्यालयाची केली तोडफोड, नेत्यांचे जाळले पुतळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:56 PM2021-02-24T16:56:55+5:302021-02-24T16:59:01+5:30

Congress And Gujarat Municipal Election Results 2021: भाजपाचा विजय झाला असून काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

gujarat municipal election results 2021 violence outside congress office in surat | ...अन् 'तो' पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला; कार्यालयाची केली तोडफोड, नेत्यांचे जाळले पुतळे

...अन् 'तो' पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला; कार्यालयाची केली तोडफोड, नेत्यांचे जाळले पुतळे

googlenewsNext

नवी दिल्ली - गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Gujarat Municipal Election Results 2021) भाजपाने (BJP) गड राखत निर्भेळ यश मिळविले. सहा महापालिकांच्या एकूण 567 जागांपैकी भाजपाने 490 जागा जिंकल्या. काँग्रेसला (Congress) या निवडणुकीत मोठा फटका बसला असून केवळ 48 जागा जिंकता आल्या आहेत. तर आम आदमी पार्टी व एमएआयएमने गुजरातच्या पालिकांमध्ये प्रवेश मिळविला, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. सूरत महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने चांगलं यश मिळवलं आहे. एकूण 120 जागांपैकी 93 जागांवर भाजपाचा विजय झाला असून काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आम आदमी पार्टीनंही 27 जागांवर यश मिळवलं आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते खूप निराश झाले आहेत. त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन केलं आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा आणि शहर अध्यक्षांचे पुतळे जाळले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून बाबू रायका, कादिर पीरजादा आणि तुषार चौधरी यांचे पुतळे जाळले आणि आरोप केला की या लोकांनी काँग्रेसला विकलं आहे. कार्यकर्त्यांनी या नेत्यांचे फोटो देखील फाडून टाकले आहेत. एकीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच या निवडणुकीत आपने नवा पर्याय दिला आहे. 

सूरतमध्ये आपने मिळवलेल्या या विजयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उत्साहही वाढला आहे. केजरीवाल 26 तारखेला सकाळी सुरतमध्ये रोड शो करणार आहेत. या निवडणुकीत भाजपने 93 जागांवर विजय मिळवला आहे. तर, आपनं 27 जागांवर विजय मिळवला आहे. 2015च्या निवडणुकांमध्ये अहमदाबाद, राजकोट, जामनगर, भावनगर, वडोदरा आणि सूरत या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपचं सरकार आलं. या निवडणुकांमध्ये दोन जागा बिनविरोध होत्या. यात वडोदरा आणि सूरतमधील एका एका जागेचा समावेश आहे.

गुजरातमधील सहाही महापालिकांमध्ये भाजपच; ‘आप’, एमआयएमचा चंचुप्रवेश, काँग्रेसला मोठा फटका

सूरतमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाबू रायका यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मागील वेळी 36 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले असून गुजरातच्या जनतेने भाजपवर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानले आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही मतदारांचे आभार मानून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींचे अभिनंदन केले. विजय रुपाणी यांनीही महापालिका विजयानंतर मतदारांचे आभार मानले. ’ॲंटी इन्कम्बंसी’ गुजरातमध्ये लागू पडत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: gujarat municipal election results 2021 violence outside congress office in surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.