अहमदाबाद- गुजरातमध्ये भाजपाचं नवीन सरकार 25 डिसेंबर रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपातील सुत्रांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नावं निश्चित करावं? याबद्दलची चर्चा सध्या भाजपामध्ये सुरू आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी गुजरातचे नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असतो. तसंच 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातची निवडणूक भाजपा, मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उप-मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्त्वात लढेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, असं जाहीर केलं होतं. सुत्रांच्या मते, यावेळी भाजपाला मिळालेल्या विजयात कमी अंतर असल्या कारणाने पक्ष नेतृत्व मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर विचार करू शकतात
भाजपाने यावेळी गुजरातमध्ये माझ्या चेहऱ्याबरोबर निवडणुक लढविली. पण मुख्यमंत्रिपदाबद्दलचा अंतिम निर्णय संसदीय बोर्डाकडूनच केला जाईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार ? या पत्रकारांच्या प्रश्नावर विजय रूपाणी यांनी उत्तर दिलं आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला 99 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या.
सुत्रांना सांगितलं की, 25 डिसेंबर रोजी नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आहे. 2012 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजीच चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
गुजरातचे मुख्य सचिव जे एन सिंह यांनी मंगळवारी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण केलं. या स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा येथे होऊ शकतो, म्हणून सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण करत असल्याचं, जे एन सिंह यांनी म्हंटलं. टीमकडून महात्मा मंदिर आणि साबरमती रिव्हरफ्रंटसारख्या ठिकाणांचीही पाहणी केली जाईल, असं ते म्हणाले.
भाजपामधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीच्या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.