केवडिया -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे जाऊन सरदार पटेलांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. यानंतर ते राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्येही सहभागी झाले. यावेळी त्यांनी जवानांना शपथही दिली. (PM Modi in Gujarat)
एकता दिवस परेडमध्ये जवानांचे शौर्य -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुजरातमधील केवडिया येथे 'राष्ट्रीय एकता दिवस' परेड सुरू आहे. यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. यावेळी जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत पंतप्रधान मोदींना सलामी दिली.
पंतप्रधान मोदींचे ट्विट -तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंती निमित्त ट्विट करत आदरांजली अर्पण केली. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले, राष्ट्रीय एकत्मता आणि अखंडतेचे अग्रदूत लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली.
सीप्लेन सेवेचा शुभारंभही करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचीही सुरुवात करणार आहेत. ते आज दुपारी 1 वाजदा वॉटर एरोड्रमचे (साबरमती रिव्हरफ्रंट) उद्घाटन करतील. तसेच, सीप्लेन सेवेचेही (साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया) उद्घाटन करतील.