शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

गुजरातेत पटेलांचे आरक्षण आंदोलन चिघळले

By admin | Published: August 26, 2015 3:54 AM

ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल

अहमदाबाद : ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल समुदायाची मंगळवारची अहमदाबादेतील भव्य रॅली विविध कारणांनी गाजली. रॅलीला हिंसेचे गालबोट लागले, तसेच पटेल-पटेल असे दोन गटही पडले. रॅलीनंतर प्रत्यक्ष रॅलीस्थळी आणि शहरात अनेक ठिकाणी संघर्ष उडाला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागले. याच दरम्यान रॅलीचे नेतृत्व करणारे पटेल समुदायाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मात्र आंदोलन चिघळण्याची शक्यता बघताच काही तासांत त्यांची सुटका करण्यात आली.आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली ‘पाटीदार अनामत आंदोलन समिती’ने मंगळवारी येथील जीएमडीसी मैदानावर ‘महाक्रांती रॅली’चे आयोजन केले. या रॅलीला पटेल समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे शहर जणू थांबले होते. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल स्वत: निवेदन घेण्यास येत नाहीत तोपर्यंत उपोषणास बसण्याचे हार्दिक यांनी यावेळी जाहीर केले. मात्र पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय उपोषणाला बसण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रात्री उशिरा हार्दिक यांना अटक केली. तत्पूर्वी मैदानावर हार्दिक यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पटेल यांच्या अटकेनंतर आंदोलन अधिकच चिघळले. आंदोलनकर्त्यांनी रात्री उशिरा गृहमंत्री रजनी पटेल यांच्या घरावर दगडफेक केली. अनेक बसगाड्यांवरही दगडफेक केली. यानंतर आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे दिसताच हार्दिक यांची सुटका करण्यात आली. रॅलीनंतर अहमदाबादेतही विविध ठिकाणी संघर्ष उडाला. स्कूटर आणि बाईकवरून आलेल्या पटेल समुदायाच्या लोकांनी ‘बंद’चा प्रयत्न केला. दलित समुदायाच्या स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केला. यामुळे दोन्ही समुदायांत संघर्ष उडाला. वदाज, वस्त्रपूर, निकोल व पालदी भागांत दोन्ही समुदाय समोरासमोर उभे ठाकले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचे नळकांडे फोडत लाठीमार करावा लागला. यानंतर संघर्षाला तोंड फुटले. याशिवाय पटेल समुदायातच दोन गट पडल्याने संभ्रम उडाला. लालजी पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरदार पटेल ग्रुपने (एसपीजी) हार्दिक पटेल यांच्या उपोषणाला बसण्याच्या निर्णयाला विरोध करीत आंदोलनापासून स्वत:ला वेगळे केले. एसपीजी हा पटेल समुदायाचा राज्यातील मोठा व प्रभावशाली गट आहे. (वृत्तसंस्था)...तर पुन्हा कमळ उमलणार नाहीरॅलीला संबोधित करताना पटेल समुदायाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी राज्यातील भाजपा सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला. तुम्ही आम्हाला आमचा अधिकार देत नसाल, तर आम्ही तो हिसकावून घेऊ. जो कुणी पटेल समुदायाच्या हिताचे बोलेल, तोच पटेल समुदायावर सत्ता गाजवेल, असे ते म्हणाले. १९८५ मध्ये आम्ही गुजरातेतून काँग्रेसला हद्दपार केले होते. आज भाजप सत्तेवर आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही. तुम्ही आमच्या हिताचे बोलाल तरच आम्ही चिखलात कमळ फुलवू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. आमचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाने प्रायोजित केलेले नाही. मागणी फेटाळलीदरम्यान गुजरातेतील पटेल समुदायाला ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याची शक्यता राज्याच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. अन्य मागास वर्ग(ओबीसी), अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी) प्रवर्गांसाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ठरवून दिलेली असल्याने पटेल समुदायास आरक्षण देणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोण आहेत हार्दिक पटेल?गुजरातेतील आनंदीबेन पटेल सरकारसाठी नाकात दम आणणारे आणि पटेल समुदायासाठी मैदानात मांड ठोकून उभा राहणारे हार्दिक पटेल हे २२ वर्षांचे युवा नेते आहेत. गेल्या दोनच महिन्यांत त्यांनी मिळवलेल्या प्रचंड जनपाठिंब्याने सगळेच अवाक् आहेत. बी.कॉम. पदवीधर असलेले हार्दिक पित्याच्या व्यवसायात हातभार लावायचे. गेल्या जुलैत त्यांनी आरक्षण आंदोलन उभारले आणि शाळा कॉलेजातील दाखल्यापासून नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातचा संपूर्ण पटेल समुदाय त्यांच्या पाठीशी उभा झाला. पटेल समुदाय ही भाजपची मोठी व्होट बँक असल्याने या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले.