विनय उपासनीलोकमत न्यूज नेटवर्कबडाेदा : हेमांग जोशी. वय वर्षे अवघे ३३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकेकाळच्या बडोदा या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. विद्यमान खासदार रंजनबेन भट्ट यांना भाजपने उमेदवारी देऊ केली. मात्र, त्यांनी मोक्याच्या क्षणी माघार घेतली. होळीच्या दिवशी एका संगीत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पक्ष कार्यालयातून दूरध्वनी जोशींना आला. तुम्ही बडोद्यातून लोकसभा निवडणूक लढत आहात. तयारी करा...
बडोद्यातून तब्बल १० लाखांच्या मताधिक्याने निवडून यायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्याच मतदारसंघातून माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला तिकीट द्यावे, हे फक्त मोदीजींमुळेच होऊ शकते, असे हेमांग म्हणतात. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या जसपालसिंह पढियार यांचे आव्हान आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्देnबडोदा हे एक सांस्कृतिक शहर आहे. तसेच या ठिकाणी औद्योगिक पट्टाही आहे. येथील मतदारांनी कायम भाजपला साथ दिली आहे.nगुजरातमध्ये काही ठिकाणी विद्यमान केंद्र सरकारवर नाराजी असली तरी बडोदा त्यास अपवाद असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
रंजनबेन भट्टभाजप (विजयी)८,८३,७१९
प्रशांत पटेलकाॅंग्रेस२,९४,५४२