नवी दिल्लीः राज्यसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधल्या काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. १९ जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी म्हणाले, 'मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता ते आमदार राहिलेले नाहीत. पटेल हे वडोदरामधील करंजन सीटचे आमदार असताना चौधरी यांनी वलसाडच्या कापराडा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मार्चच्या सुरुवातीला कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आणखी दोन आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत सत्ताधारी भाजपाकडे 103 आमदार आहेत आणि विरोधी कॉंग्रेसकडे आता 66 आमदार आहेत. नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तीन आणि कॉंग्रेसने दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. अभय भारद्वाज, रामलीला बडा आणि नरहरी अमीन यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर कॉंग्रेसने शक्तीसिंह गोहिल आणि भरतसिंह सोलंकी यांची नावे जाहीर केली आहेत.मध्य प्रदेशमधील ताकदवान नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीसुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे हे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये दाखल झाले. 19 जून रोजी राज्यसभेच्या 24 जागांसाठी मतदान होईल.
हेही वाचा
चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?
PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा
Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला
मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतले ६ मोठे निर्णय, कोलकाता बंदराला दिलं श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव
मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण