मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सध्या सुरू आहे. सकाळपासून येत असलेल्या ट्रेण्ड्समध्ये भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस काही जागांनी पिछाडीवर आहे. दोन्ही पक्षांमध्ये कांटेकी टक्कर बघायला मिळते आहे. निकालाचे सुरूवातीचे ट्रेण्ड्स सोशल मीडियावरही चर्चेचा विषय आहे. ट्विटरवर सर्वसामान्य लोकांनी विविध मेम्स टाकून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलवरून ट्विटरकरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मतमोजणीच्या सुरूवातीच्या काँग्रेस आघाडीवर होतं त्यावरही ट्विटरकरांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गुजरातमध्ये भाजपाची आघाडी शंभरीपार- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. आतापर्यंत 182 मतदारसंघांचा कल हाती आला आहे. काँग्रेसने सुरुवातीच्या कलांमध्ये घेतलेली आघाडी भाजपाने मोडीत काढली असून, सध्याच्या कलांनुसार भाजपा 107 तर काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात आहे. दरम्यान, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला, काँग्रेसची पिछाडीगुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणीला सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाने 41 आणि काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.