शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Khambhat Violence : खरगोननंतर गुजरातच्या खंभातमध्येही चालला बुलडोझर, अनेक दुकानं जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 4:57 PM

रामनवमीला काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत.

गुजरातमधील (Gujrat) खंभात येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी (Ram Navami Violence) सरकारने मोठी कारवाई केली आहे. रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत.

बेकायदा मालमत्तांवर चालला बुलडोझर -मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारातील आरोपींची मालमत्ताही बेकायदेशीर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. ही मालमत्ता खरोखरच बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यास, त्यांवरही बुलडोझर चालविला जाणार आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही हिंसाचार आणि दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर प्रशासनाने बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या आहेत.

रामनवमीच्या दिवशी झाला होता हिंसाचार -गुजरात मधील आनंद जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी हिंसाचार  झाला होता. खंभात भागात झालेल्या हिंसाचारासंदर्भात एका पाठोपाठ एक खुलासेही होत आहेत. एवढेच नाही तर, रामनवमीच्या शोभा यात्रेवर हल्ल्याचा सुनियोजित कट रचण्यात आला होता, अशी माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी केला मोठा खुलासा -खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यासाठी मुलांना बाहेरून बोलावण्यात आले होती. एवढेच नाही, तर पकडले गेल्यास त्यांना सर्व प्रकराचे कायदेशीर आणि आर्थिक सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, हा कट रचणाऱ्यांनी कब्रस्तान जवळ उभे राहून मिरवणुकीवर दगडफेक करायचे आधीच ठरवले होते. कारण कब्रस्तानात दगड सहजपणे सापडतात, असे पोलिसांनी म्हटले आहे.

खरगोनमध्येही चाललागेला बुलडोझर -रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर, खंभातशिवाय मध्यप्रदेशातील खरगोनमध्येही सरकारने हिंसाचाराच्या आरोपींविरोधात जबरदस्त कारवाई केली आहे. खरगोनचे डीआयजी तिलक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारात 84 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, आरोपींच्या घरांवर आणि दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे. यात 16 घरे आणि 29 दुकानांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातRam Navamiराम नवमीGovernmentसरकारEnchroachmentअतिक्रमण