हिंमतनगर: 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी गुजरातमधील हिंमतनगर, खंभात आणि द्वारका या तीन जिल्ह्यांमध्ये दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. दंगलीनंतर तिन्ही जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली. मात्र, सोमवारी रात्री उशिरा हिंमतनगरमधील वंजारवास परिसरात पुन्हा दंगल उसळली. दंगलखोर इतर समाजातील लोकांच्या घरांना लक्ष्य करत आहेत.
यापूर्वी पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही दंगलखोरांनी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केली, परिणामी डझनभर कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. यादरम्यान पीडितांना पोलिसांचीही मदत मिळत नाहीये.
सोमवारी रात्री बॉम्ब हल्ले पोलिसांनी त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्याचे वंजारवास परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. पण, सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर हल्ला झाला. घरांची तोडफोड करण्यात आली आणि सामानाचीही चोरी झाली. रात्री चंदनगर आणि हसननगर येथील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. दंगलखोरांनी त्यांच्या घरांवर पेट्रोल-बॉम्ब फेकले, त्यामुळे दोन घरेही जाळण्यात आली. पोलिस पथक पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.
पोलिस बंदोबस्त असतानाही हल्ला हिंमतनगरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर गृहविभाग आणि पोलीस कामाला लागले. पोलीस, आरएएफ आणि एसआरपी तैनात करण्यात आले होते. परिस्थितीची पाहणी करुन दंगल रोखण्यासाठी सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठकही झाली. पण, शांतता समितीची बैठक होऊन पाच तास उलटले असताना रात्री उशिरा हिमतनगर येथील वंजारवास येथे हल्ला झाला.
गृहराज्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेपरिसरात राहणारे राहुल सिंह राजपूत यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास 50 कुटुंबे बस्ती सोडून गेली आहेत. स्थलांतराची माहिती मिळताच गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी वंजारवास गाठले आणि लोकांना त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. सध्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.