शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 6:12 AM

लेवा पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हे दोन्ही चेहरे सुरत महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपला त्रासदायक ठरत होते.

शांतीलाल गायकवाडसुरत : गुजरातमधील अहमदाबादनंतरचे दुसरे मोठे शहर व व्यापार उद्योगाचे केंद्र असलेल्या सुरतवर भाजपची पकड गुरुवारी जाहीर झालेल्या निकालाने पुन्हा मजबूत झाली आहे. दक्षिण गुजरातमध्ये भाजपने काँग्रेससह आम आदमी पार्टीलाही अक्षरश: धूळ चारली आहे. सातव्यांदा राज्याची सत्ता हाती घेणाऱ्या भाजपविषयी मतदारांत राग होताच, पण ‘मोदी हैं तो गुजरात हैं’ ही त्यांची प्रतिक्रियाही सर्व सांगून जात होती, हे निकालातून दिसलेच.

भाजपची सुरतेवरील पकड मागील २००२च्या निवडणुकांपासून आहेच. पण यावेळेस खुंटी हलवून अधिक मजबूत करतात, तशी भाजपने अधिकच सशक्त केली आहे. सुरत जिल्ह्यातून आपला विधानसभेत प्रवेशाची संधी मिळेल, अशी वर्तविलेली भाकिते मतदारांनी मतपेटीतून चुकीची ठरविली  आहेत. सुरत शहरातील  विधानसभेच्या  कतारगाम आणि वराछा रोड या दोन जागा आप भाजपकडून खेचून घेईल, असे वाटत असतानाही भाजपने मिळविलेला एकहाती विजय हा विरोधी पक्षांना त्यांचे गुजरातेतील स्थान दाखविण्यास पुरेसे आहे. या कतारगाममधून आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि वराछा रोडमधून प्रसिद्ध विधिज्ञ अल्पेश कथारिया या दोन लेवा पाटीदारांनी भाजपच्या नाकात दम आणला खरा, परंतु हा दम ते विजयात परावर्तित करू शकले नाहीत.  

लेवा पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हे दोन्ही चेहरे सुरत महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपला त्रासदायक ठरत होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना सुरतमध्ये २५ ते ३० किलोमीटरचा रोड शो करून वराछा मतदारसंघात जाहीर सभाही घ्यावी लागली होती. या दोन्ही मतदारसंघात आपच्या  उमेदवारांना भरघोस  मते मिळाली आहेत.

जिथे दबदबा तिथेही घाटादक्षिण गुजरातेत बहुसंख्य एससी व एसटी राखीव मतदारसंघ आहेत. या राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या दोन जाहीर सभा गुजरातेत घेतल्या त्या याच भागात; परंतु मोदींच्या झंझावातात हा दबदबाही पार पाचोळ्यासारखा उडून गेला. तापी जिल्ह्यातील दोन्ही एसटी राखीव जागा त्यामुळे भाजप जिंकू शकली. व्यारातील काँग्रेस उमेदवार पूनाभाई गामीत पाचव्यांदा नशीब अजमावत होते. ते पराभूत झाले. तेथून भाजपने दिलेले धर्मांतरीत कोंकणी हे विजयी झाले. नर्मदा ते डांग या आदिवासी पट्ट्यात भाजपचा जोर दिसून आला.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा