कमलेश वानखेेडे
पोरबंदर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जन्मभूमी असलेल्या पोरबंदर येथे विधानसभेची निवडणूक ‘साम-दाम...’सह लढली जात आहे. भाजपचे बाबुभाई बोखिरिया व काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया हे एकमेकांच्या विरोधात दोन-दोन वेळा जिंकले आहेत.
इथे मतदारसंघात महेर समाजाचे प्राबल्य आहे. त्यापाठोपाठ खारवा (मच्छीमार), ब्राह्मण, कोळी समाजाची मते आहेत. काँग्रेस व भाजप हे दोन्ही उमेदवार महेर समाजाचे आहेत. गेल्यावेळी इथे काट्याची टक्कर झाली. भाजपचे बाबुभाई हेे पोरबंंदरचे चारवेळा आमदार राहिले आहेत. गेेल्यावेळी त्यांनी काँग्रेसचे मोढवाडिया यांच्यावर विजय मिळवला. यावेळी पुन्हा मोढवाडिया हेे काँग्रेसकडून रिंगणात आहेत. आम आदमी पार्टीने खारवा (मच्छीमार) समाजाचे जीवन जुंगी यांना रिंगणात उतरविले आहे.
‘गांधी स्मृतिभवन’च पाच वर्षांपासून बंदिस्तब्रिटिशांशी लढा देताना महात्मा गांधी यांनी अनेकदा तुरुंगवास सहन केला. त्यांच्याच जन्मभूमीत उभारण्यात आलेले ‘गांधी स्मृतिभवन’ हे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. गेटवर लागलेले कुलूप आता गंजून गेले आहे. हिरवळ सुकून गेली आहे. भिंतींचा रंंगही उडला आहे. इथे गांधीजींच्या स्मृती जपल्या जाणार होत्या. त्यांच्या कामाची महती सांगणारा लेझर शो होणार होता. परंतु, यातील काहीही होऊ शकलेले नाही.
गावातच दारूचा महापूरमहात्मा गांधी यांनी आयुष्यभर व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. गांधींजींच्या आदर्शांवर चालत गुजरातमध्ये दारूबंदीही करण्यात आली. पण गांधीजींची जन्मभूमी असलेल्या पोरबंदरमध्ये सहजपणे दारू विकली जाते. लोकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. पोलिस रेकॉर्ड मेन्टेन करण्यासाठी कारवाया करतात. पण बंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही.