- मुकेश इंगोले -- यवतमाळ : या केंद्रावर सर्वच महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची असणार आहेत. या मतदान केंद्रामुळे महिलांना मतदान करणे सोयीचे होणार असून, महिलांची मतदानातील टक्केवारी वाढेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. या वेळी प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. या प्रयोगामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढल्यास भविष्यात असे मतदान केंद्रांची संख्या वाढू शकतात. त्यामुळे या केंद्रावरील महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणे गरजेचे राहणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.महिला मतदान केंद्र निवडताना म्हणजे केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची, तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाºयांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड होईल, असेही अधिकारी म्हणाले.
प्रत्येक तालुक्यात ‘गुलाबी’ मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:28 AM