विधान परिषदेसाठी गुलाबराव देवकर, गुरुमुख जगवाणींसह ८ अर्ज दाखल अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस : अमोल पाटील, शशांक देशपांडे, हरिश गनवाणी,बरडे
By admin | Published: November 02, 2016 12:41 AM
जळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आणि काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड यांच्यासह जिल्हाभरातील एकूण सात उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात८उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान,बुधवार, २नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्जदाखलकरण्यासाठीगर्दी होण्याची शक्यता आहे.
जळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आणि काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड यांच्यासह जिल्हाभरातील एकूण सात उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात८उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान,बुधवार, २नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्जदाखलकरण्यासाठीगर्दी होण्याची शक्यता आहे.देवकर समर्थकांसह तर जगवाणी आले एकटेमंगळवारी दुपारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झालीहोती. दीड वाजेच्या सुमारास माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी खासदार ॲड.वसंतराव मोरे, कार्याध्यक्ष विलासपाटील,ॲड.रवींद्र पाटील, विनोद देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येनेउपस्थित होते. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी हे एकदोन सहकार्यांसह दाखल होऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारीघेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा उमेदवाराच्या नावाबाबत बोलणे टाळले. मात्र इकडे डॉ.जगवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.जगवाणीवदेवकरयांनीअर्जदाखलकेले.मात्रत्यांच्याअर्जासोबतएबीफॉर्मजोडलेलानव्हता.काँग्रेसकडून छाजेड यांना एबी फॉर्मचोपडा येथील नगरसेविका लताबाई गौतम छाजेड यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाने दिलेला ए.बी.फॉर्म देखील त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, निर्जलाबाई भिल, चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, चोपड्याच्या नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, मेहमूद बागवान, प्रा.विलास दारूंडे, कल्पना जगताप, सुभद्राताई वाडे, चंद्रशेखर युवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.या सातउमेदवारांनी सादर केले अर्जमंगळवारी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भुसावळचे नगरसेवक विजय मोतीराम चौधरी, जि.प.सदस्य विजय दत्तात्रय पाटील, अमळनेरचे नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील, चोपड्याच्या नगरसेविका लताबाई गौतम छाजेड, पारोळ्याचे नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २१ जणांना उमेदवारी अर्जाचे वितरणमंगळवारी दिवसभरात २१ जणांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज नेले. यात जिल्हा बँक संचालक अमोल चिमणराव पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, रावेरचे हरिश गनवाणी,खान्देश विकास आघाडीचे नितीन बरडे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे.