ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 17- गुलबर्ग सोसायटीत नरसंहारातल्या 24 दोषींपैकी 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टानं सुनावणीदरम्यान या नरसंहाराला सर्वात मोठा काळा दिवस असं म्हटलं आहे. 2002च्या नंतर गोध्रा कांडाच्या नंतर सर्वात मोठं कांड म्हणून गुलबर्ग मोठं हत्याकांड असल्याचं बोललं जातंय. या हत्याकांडात काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह 69 लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. 11 दोषींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दोषींना फाशीच्या शिक्षा न देता कोर्टानं त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडत 24 दोषींपैकी 13 दोषींना 10 वर्षांची शिक्षा, तर 12 दोषींना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश पी. बी. देसाई यांनी विशेष न्यायालयात ही सुनावणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी एकाही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी तब्बल 14 वर्षांनंतर निकाल देताना न्यायालयाने 66 पैकी 24 हल्लेखोरांना दोषी ठरविले होते तर इतरांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
त्याआधी कोर्टाने दोन जून रोजी हत्या आणि अन्य गुन्ह्यात 11 लोकांना दोषी ठरविले होते. दरम्यान विहिंप नेते अतुल वैद्यांसह 13 अन्य याप्रकरणी किरकोळ गुन्ह्यात दोषी ठरविले गेले होते.
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड 28 फेब्रुवारी 2002 रोजी घडले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. जवळपास 400 लोकांच्या संतप्त जमावाने अहमदाबादमधील या सोसायटीवर हल्ला केला होता. या सोसायटीमधील जाफरींसह रहिवाशांची हत्या केली होती. या हिंसाचारात 69 जणांची हत्या करण्यात आली होती.