नवज्योत सिंग सिद्धू पाठोपाठ अजून एका बड्या नेत्याचा राजीनामा, पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 07:56 PM2021-09-28T19:56:34+5:302021-09-28T19:57:05+5:30

Punjab Congress News: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील वाद मिटण्याऐवजी ते अधिकच उफाळून आले आहेत.

Gulzar Inder Chahal steps down as Punjab Congress treasurer | नवज्योत सिंग सिद्धू पाठोपाठ अजून एका बड्या नेत्याचा राजीनामा, पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ 

नवज्योत सिंग सिद्धू पाठोपाठ अजून एका बड्या नेत्याचा राजीनामा, पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ 

Next

चंदिगड - पंजाबकाँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकीय वादळ थांबता थांबत नाही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबकाँग्रेसमधील वाद मिटण्याऐवजी ते अधिकच उफाळून आले आहेत. आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत असतानाच पंजाब काँग्रेसमधील अजून एका बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Gulzar Inder Chahal steps down as Punjab Congress treasurer following the resignation of party's state unit chief Navjot Singh Sidhu)

गुलजार इंदर चहल यांना हल्लीच आठवडाभरापूर्वी २१ सप्टेंबर रोजी औपचारिकपणे कोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. चरणजीत सिंग चन्नी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. चहल यांच्यासोबत परगट सिंग आणि योगिंदर पाल सिंग ढिंगरा यांना त्याच दिवशी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

याआधी आज नवज्योत सिंग सिद्धूने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करू शकत नाही, असे सांगत त्यांनी राजीनामा दिला होता. कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामधील घसरण ही तडजोडीमधून सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणच्या अजेंड्यासोबत कुठलीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेचच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेसची सेवा करत राहीन, असे सिद्धू यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटले होते.

नवज्योत सिंग सिद्धू यांना २३ जुलै रोजी पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली  दौऱ्यापूर्वी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबमध्ये गेल्या काही काळात नवज्योत सिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्या गटांमध्ये वाद पेटला होता. दरम्यान, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात जात नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र सिद्धू यांनी आज अखेर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर अनेक मुद्द्यांवरून सिद्धू नाराज होते. त्यांना सरकारी कार्यक्रमांमधूनही बाजूला ठेवण्यात येत होते. अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

Web Title: Gulzar Inder Chahal steps down as Punjab Congress treasurer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.