Video - अरे देवा! आधी हनुमानाला नमस्कार केला अन् नंतर लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 02:37 PM2024-08-25T14:37:56+5:302024-08-25T14:38:45+5:30
गुना येथील प्राचीन महाभारतकालीन हनुमान टेकडी मंदिरात चोरी झाली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मध्य प्रदेशच्या गुना येथील प्राचीन महाभारतकालीन हनुमान टेकडी मंदिरात चोरी झाली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सहा जणांनी मिळून मंदिराच्या सुरक्षा रक्षकाला दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवलं. यानंतर दोघांनी गर्भगृहात प्रवेश केला. गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी चोरट्यांनी देवाला नमस्कार केला आणि नंतर हनुमानजी आणि सिद्धबाबांच्या मूर्तीवर असलेले चांदीचे हार, मुकुट, गदा, छत्री, बांगड्या असे दागिने चोरून नेले.
दरोड्याची ही घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये गर्भगृहात घुसून चोरट्यांनी दागिने चोरल्याचं दिसून येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या चोरट्याच्या हातात कटर होता. ज्याच्या मदतीने तो दागिने कापून काढत होता. हनुमान टेकडी मंदिरात आतापर्यंत चार वेळा चोरी झाली आहे. अशा परिस्थितीत मंदिराच्या सुरक्षेबाबत पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गुना स्थित महाभारत कालीन हनुमान टेकरी मंदिर में जो कुछ हुआ, वह किसी पुरानी फिल्मी कहानी से कम नहीं। 6 डकैत मंदिर में घुसे और सुरक्षाकर्मी शिशुपाल को पकड़कर पेड़ से बांध दिया।
— अनुराग 🇮🇳 (@VnsAnuTi) August 25, 2024
इसके बाद दो बदमाश गर्भ गृह में पहुंचे। पहले हनुमान जी को बड़े आदर से प्रणाम किया और फिर हनुमान जी और… pic.twitter.com/wvvjRR4Opc
दरोड्याबाबत मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान टेकडी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मात्र चोरीच्या या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. हनुमानाच्या मूर्तीवरून ८ चांदीच्या बांगड्या, ३ नेकलेस, २ गदा, पादुका आणि २ छत्र्या चोरीला गेल्या आहेत.
सिद्धबाबा आणि देवीचे दागिनेही चोरीला गेले. एकूण १२ किलोहून अधिक चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी श्वानपथक आणि फिंगर प्रिंट तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांचे पथक मंदिरामागील जंगलात शोध घेण्यात व्यस्त आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असं म्हटलं आहे.