गुंटूर : आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार गल्ला जयदेव यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर मंगळवारी रात्री आयकर विभागाने छापा टाकला. दरम्यान, आयकर विभागाने केलेल्या कारवाई विरोधात टीडीपीच्या नेत्यांनी आंदोलन केले.
आयकर विभागाने केलेल्या कारवाई प्रकरणी टीडीपी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहे. आयकर विभागाकडून होणारी कारवाई निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर होत आहे की जगनमोहन रेड्डी यांच्या सांगण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, याबाबत आम्हाला माहिती नाही, असे टीडीपी प्रवक्ता एल. दिनाकरन यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार गल्ला जयदेव यांनी आपल्या एक व्यक्तीला आयकर विभागाने ताब्यात घेतल्याचे सांगितेल. तसेच, ते म्हणाले की, 'फक्त आमच्या पार्टीच्या नेत्यांना आयकर विभाकडून लक्ष करण्यात येत आहे. जर निवडणूक आगोय आणि इतर यंत्रणा निष्पक्ष काम करत आहेत, तर फक्त अशी कारवाई सर्व पक्षांवर झाली पाहिजे.'