शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

गुरुदासपूरमध्ये शोधमोहीम सुरू

By admin | Published: January 07, 2016 12:06 AM

पंजाबवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील तिबरी या छावणी भागात लोकांनी लष्कराच्या पोशाखातील

गुरुदासपूर : पंजाबवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील तिबरी या छावणी भागात लोकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर बुधवारी येथे अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर लगेच पोलीस व लष्कराने शोधमोहीमही हाती घेतली.तिबरी हे छावणी क्षेत्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकऱ्यांनी तिबरीच्या आजूबाजूला लष्कराच्या वेशातील दोघांना संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले. गावकऱ्यांकडून याबाबत सूचना मिळताच, पोलिसांनी लष्कराला माहिती दिली. यानंतर या संपूर्ण भागात संयुक्त शोधमोहीम सुरू झाली. तूर्तास या छावणी क्षेत्रात अती सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)पठाणकोट : असा झाला खात्मापठाणकोट : पठाणकोट एअरबेसवरील सर्व सहा अतिरेकी ठार झाले असले तरी बुधवारीही सुरक्षा दलांचे ‘सर्च आॅपरेशन’सुरूच होते. सहाही अतिरेकी सतत गोळीबार आणि हातगोळे डागत असतानाच राष्ट्रीय सुरक्षा गार्डने (एनएसजी) गार्डस् व लष्कराच्या मदतीने त्यांचा खात्मा करण्यासाठी पावलोपावली ‘सर्जिकल आॅपरेशन’ राबवले. २५० मीटरच्या टप्प्यात अतिरेक्यांना घेरण्याची एनएसजीची योजना होती आणि ती यशस्वी ठरली.अतिरेकी हल्ल्यानंतर चार दिवस ‘ओलिस’ राहिलेल्या पठाणकोट हवाईतळावर अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. याशिवाय अतिरेकी हल्ल्याच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, पुढील एक वा दोन दिवस ते सुरू राहण्याची शक्यता आहे. अतिरेक्यांना ठार करणे अतिशय आव्हानात्मक होते. कारण एकीकडे सुरक्षा दलास एअरबेसवरील कुटुंबे, हवाईदलाची संपत्ती आणि इमारतींना धक्का लागू द्यायचा नव्हता, तर दुसरीकडे अतिरेक्यांना एका विशिष्ट भागात घेरून ठार करायचे होते. यासाठी गार्डस्, हवाईदलाचे विशेष दल आणि लष्कराने विशिष्ट ठिकाणी प्रत्येक पावलागणिक सर्जिकल आॅपरेशन राबवले आणि सहाही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या आॅपरेशनमध्ये देशाने आपले सात जवानही गमावले. (वृत्तसंस्था)पठाणकोट हवाईतळावर अतिरेक्यांविरुद्ध राबवण्यात आलेले अभियान सर्वाधिक यशस्वी असल्याचा दावाही भाजपने केला.भाजप सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोन आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी बोलून दाखवली. मुंबई अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानकडून अशी कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मोदींनी पाकिस्तानकडे पठाणकोट हल्ल्याप्रकरणी निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली. शरीफ यांनीही त्यांना कारवाईचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले.