शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निवडणुकीपूर्वी राम रहीमला 21 दिवसांची फर्लो मंजुर, राज्यातील 69 मतदारसंघात आहे मोठा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 12:48 PM

पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे.

रोहतक: बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची फर्लोवर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुरमीत हरियाणातील रोहतक तुरुंगात बंद आहे. पंजाबमधील निवडणुकीच्या 13 दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटका होत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. यामुळेच राम रहिमची पॅरोल मंजूर झाल्याची चर्चा आहे.

डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या 21 दिवसांच्या फर्लो (रजा) अर्जाला मंजुरी दिली आहे. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर त्याला तुरुंगाबाहेर आणले जाईल.

राम रहीमला घेण्यासाठी ताफा रवाना सिरसा डेरालाही राम रहीमला पॅरोल मिळाल्याची माहिती मिळाली आहे. तेथे उपस्थित भाविकांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली असून, एक ताफा राम रहीमला घेण्यासाठी रोहतकच्या सुनारिया कारागृहाकडे रवाना करण्यात आला आहे. दोन साध्वींवर बलात्कार आणि दोन हत्या केल्याप्रकरणी राम रहीम सुनारी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

निवडणुकांमध्ये डेराचा प्रभाव2007पासून गुरमीत राम रहीमने राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली होती. 2007, 2012, 2017 पंजाब विधानसभा निवडणुकीत डेराचा मोठा प्रभाव दिसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतही डेरा प्रमुखाने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे कौतुक केले होते. मतांच्या राजकारणासाठी सर्व नेते डेराकडे जातात.  

टॅग्स :Gurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमHaryanaहरयाणाPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२