नवी दिल्ली, दि. 01 - मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने बलात्काराच्या आरोपात शिक्षा सुनाविलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याचं ट्विटर अकाउंट बंद केले आहे. गेल्या आठवड्यात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोन बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविले होते. दरम्यान, ट्विटरने काही गाइडलाइन दिल्या आहेत. या गाइडलाइन्स जे कस्टमर्स फॉलो करत नाहीत, त्यांचे ट्विटरवरील अकाउंट ब्लॉक करण्यात येते. ट्विटरवर गुरमीत राम रहीम याचा अकाउंच होते, तसेच अनेक फॉलोवर्स आहेत. गुरमीत राम रहीम ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह राहत होता. मात्र, त्याच्या नावाने ट्विटरवर सर्च केले असता Account Witheld असा मेसेज दाखविण्यात येत आहे. बराचवेळा ट्विटरकडून सेफ्टीसाठी कोणाचेही अकाउंटला एखाद्या देशापुरते बंद करण्यात येते. गुरमीत राम रहीम याचे सुद्धा ट्विटर अकाउंट फक्त भारतापुरते Witheld करण्यात आले आहे, असे नोटिफिकेशनमध्ये दाखविण्यात येत आहे. दरम्यान, ट्विटरने स्वत: गुरमीत राम रहीम याचे ट्विटर अकाउंट Witheld केले आहे की सरकारी एजन्सीकडून करण्यात आले आहे, याबाबत अद्याप काही समजू शकले नाही.
राम रहीमची निकटवर्तीय आणि दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस जारी
- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची दत्तक मुलगी हनीप्रीत सिंगविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हनीप्रीत सिंग सध्या फरार असून हरियाणा पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप हनीप्रीत सिंगवर करण्यात आला आहे. पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याने हनीप्रीत सिंग देश सोडून जाऊ शकत नाही.
जेलमधील कैदीही राम रहीमवर संतापलेत, मारहाण करतील याची पोलिसांना भीती
- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला जेलमध्ये इतर कैद्यांपासून लांब ठेवण्यात आले आहे. राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे कारागृहातील कैदी संतापले असून ते राम रहीमवर हल्ला करण्याची भीती आहे , अशी माहिती जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याने दिली आहे.