गुरुग्राममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता मुलाच्या आईने टाहो फोडला आहे. "माझा तरुण मुलगा गेला. २१-२२ वर्षांचा मुलगा, जो नंतर वृद्ध पालकांचा आधार बनला असता. आता आम्ही कुठे जाऊ? माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्याला पोलीस ठाण्यातून जामीन मिळाला. हा कोणता कायदा आहे? आज त्याने माझ्या मुलासोबत हे केलं, उद्या तो दुसऱ्यांचा जीव घेईल" असं मुलाच्या आईने म्हटलं आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकची एसयूव्हीला धडक बसली आणि या अपघातात बाईक चालवणाऱ्या अक्षतला आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर आता अक्षतच्या आईने सरकार आणि यंत्रणेला अनेक प्रश्न विचारले आहेत. 'आज तक'शी बोलताना अक्षतची आई म्हणाली की, "आमची अवस्था आता कोणाशीही बोलण्याची नाही. आम्हाला न्याय मिळावा एवढीच इच्छा आहे. अशा प्रकरणात कायदा काय आहे आणि आरोपीला का सोडण्यात आले, हे आम्हाला माहीत नाही?"
"देशात कायद्याची कमतरता"
"देशात कायद्याची कमतरता आहे. तुम्ही कोणाच्या तरी मुलाला मारून जामिनावर सुटता. अपघाताला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे वय २५ वर्षे आहे. जर त्याने हे आधी केले असेल तर तो पुन्हा करेल. तो अजून किती लोकांचा जीव घेईल हे माहीत नाही. ज्याने आमच्या मुलाची हत्या केली त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की इतर कोणाच्या बाबतीत असे घडू नये."
अक्षतच्या मित्राने पोलिसांवर केले आरोप
अक्षतचा मित्र प्रद्युम्न हाही या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे. पोलिसांनी घटनेच्या दिवशीचं फुटेज घेतलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भरधाव वेगाने वाहन चालवण्याची लेन आहे. आरोपी चुकीच्या दिशेने येत होता. अपघातानंतर तीन पोलिसांनी फुटेजसाठी माझ्याशी संपर्क साधला. तर आरोपी या आधीच जामिनावर बाहेर आला होता. रविवार आणि सोमवार सुटी असतानाही आरोपींना लगेच जामीन मिळाला.
हरियाणातील गुरुग्राममध्ये १५ सप्टेंबर रोजी बाईक आणि महिंद्रा 3XO SUV यांच्यात झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या अपघातात बाईक चालवणाऱ्या अक्षत गर्ग नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. अक्षत गर्ग हा रविवारी रात्री बाईक चालवत असताना कारने त्याला धडक दिली. यामध्ये अक्षतचा मृत्यू झाला आहे.